नांदेड फाट्यावर झाडांच्या जीर्ण फांद्या लोकांचा जीव घेण्याच्या प्रतीक्षेत

 


नांदेडगाव: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यावर नांदेडफाटा अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. अवजड वाहनांमुळे या भागात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्याची दुर्दशा झालेली असून वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच  नांदेड फाट्यावर असलेल्या वडाच्या जीर्ण फांद्या सतत पडत असतात. अजूनही धोकादायक अश्या वडाच्या जीर्ण फांद्या पारंब्याला अडकून आहेत. या जीर्ण फ़ांद्या जर झाडाखालील रस्त्यावर पडल्या तर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचा जीव ही जाऊ शकतो. 



नांदेड सिटी गेट ते नांदेड फाटा बाजुला रस्त्याच्या दुतर्फा असणारी वादाची झाडे या रस्त्याचे सौदर्य वाढवण्याचे काम करत आहेत. नांदेड फाट्यावरील काही झाडांच्या फांद्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत.  येणारे- जाणारे प्रवाशी, पादचारी,  अंगावर वाऱ्याने झाडे कोसळण्याची शक्‍यता आहे. तसेच या झाडांवर माकडांचाही वावर असतो. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर जीर्ण झाडे पडून मोठी दुर्घटना होऊ शकते. या रस्त्याने जाणारे कंटेनर, ट्रक, एसटी अशी मोठी वाहने झाडांची फांदी चुकविण्याच्या प्रयत्नात एका पटट्यातुन दुसऱ्या पट्ट्यात येऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 


नांदेड फाट्यावरील स्थानिक नागरिक शिवाजी दरवाडकर हे रस्त्याने जात असताना अशीच जीर्ण झालेली फांदी त्यांच्या शेजारीच झाडावरवरून पडली. या मध्ये ते थोडक्यात बचावले. अजूनही झाडाची एक धोकादायक फांदी पारंबीला अडकलेली आहे. ती जर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडली तर जीव ही जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.


"नांदेड फाट्यावरून महाराष्ट्र बँकेकडे जात असताना अचानक वाळलेली झाडाची फांदी माझ्या शेजारीच पडली, झाडावर माकडे इकडून तिकडे उद्या मारत असताना ती फांदी मोडली. नशिबाने माझ्या ती अंगावर पडली नाही, नाहीतर जीवास मुकावे लागले असते. धोकादायक जीर्ण फांद्या लवकरात लवकर काढाव्यात" शिवाजी दारवटकर, स्थानिक नागरिक 



अजूनही धोकादायक जीर्ण फांद्या असून प्रशासनाने लवकरात लवकर त्या काढाव्यात, रस्त्याच्या मध्यभागी पारंबीला अड्डकलेली ही फांदी ८ ते १० किलोच्या वजनाची हि जीर्ण फांदी असून येणारे- जाणारे एखाद्याच्या अंगावर पडल्या तर जीव जाऊ शकतो. बिपीन रोकडे, स्थानिक नागरिक 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.