सिंहगड टाईम्स च्या व्हाट्स अॅप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
पुणेः पुण्यात अजून एक उड्डापूल उभारण्यात येणार असून, तो सिंहगड रस्त्यावरील राजारामपूल ते फन टाइम थिएटरपर्यंत बांधला जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. सिंहगड परिसरातील या कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी शहरात अजून एक उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. मोहोळ म्हणाले की, राजाराम पूल ते फन टाइम थिएटर पर्यंत हा उड्डाणपूल असेल. या उड्डाणपुलाची लांबी 2.6 किलोमीटर राहणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ सप्टेंबर रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असून, यावेळी पालकमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.
सर्वसाधारण सभा मंजुरी देईल या भरवशावर वर्क ऑर्डर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुर सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला तीन महिन्यांपुर्वी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. परंतू उड्डाणपुलाच्या कामासाठी पुरेसा निधी नसल्याने पुढील अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे प्रलंबित राहीला आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या पुलाच्या कामाची वर्कऑर्डरच दिलेली नाही. दरम्यान, सर्वसाधारण सभेमध्ये आर्थिक तरतूदीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभा मंजुरी देईल या भरवशावर संबधित ठेकेदाराला वर्कऑर्डर द्यावी. असा प्रस्ताव आज स्थायी समितीमध्ये मंजुर करण्यात आला अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उड्डाणपूल उभारून वाहतूक कोंडी सुटेलच याची खात्री नाही. कारण घराबाहेर पडताना प्रत्येकजण आपली चारचाकी अथवा दुचाकी घेऊनच पडतो. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त होते. शिवाय प्रदूषणही वाढते. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या दोन्हीवरही मात करायची असेल, तर जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजेच सिटी बसचा वापर करावा लागेल. त्यानंतरच हा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा पुणेकरांचे असेल हाल होत राहतील, यात शंका नाही.