सिंहगड टाईम्सच्या व्हाट्स अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
नांदेडगाव: भक्तिमय विचारधारणेतून नांदेड गावाचे युवा नेते उमेश कारले यांच्या वतीने ऑनलाइन आयोजित केलेल्या घरगुती गौरी-गणेशोत्सव सजावट प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोविड काळात प्रत्यक्ष श्रीगणेशाचे दर्शन घेणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर कारले परिवाराच्या वतीने सर्वांच्या घरगुती गणेश उत्सवाची छायाचित्रे ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित केली होती. विशेष म्हणजे या संकल्पनेस नांदेड सिटी, नांदेड गाव, कीटकटवाडी, खडकवासला भागातून उत्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
समाजात निम्मी संख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा विश्वास युवा नेते उमेश कारले यांनी व्यक्त केला. महिला स्पर्धकांकडून पौराणिक आणि पारंपरिक घरगुती देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्याचा काल बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. स्थानिक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले. सर्व स्पर्धकांचे स्वागत आश्वनी कारले यांनी केले तर सर्व उपस्थितांचे व स्पर्धकांचे आभार उमेश कारले यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतुल कारले यांनी केले.
घरगुती गणेशोत्सव सजावटींसाठी पहिला क्रमांक अमृता भूषण कारले यांनी पटकावला असून त्यांना पहिल्या क्रमांकाचे फ्रिज बक्षीस म्हणून देण्यात आले. दुसरे पारितोषिक विजेत्या पौर्णिमा सूर्यकांत कोडितकर यांना एलइडी टीव्ही देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस गायत्री करजावणे करजावणे यांनी ड्रेसिंग टेबल देण्यात आला. तसेच चौथा क्रमांक आशाताई मते, सहावा क्रमांक दिलीप काका शिंदे, सातवा क्रमांक दीपाली प्रवीण पवार यांनाही बक्षिसे देण्यात आली. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना ही या वेळी पारितोषिके देण्यात आली यामध्ये मेघा सूर्यवंशी आरती पाटील, सायली दाभाडे, पल्लवी कांबळे, रेखा म्हस्के, सुलक्षणा गायकवाड, भरती माने, रुपाली दहिभाते यांचा सहभाग होता.
या वेळी दिनेश देडगे, वैभव देडगे, सूर्यकांत कोडितकर, सुहासदादा देडगे, उपसरपंच सुहासदादा देडगे, उद्योजक सुनील वाल्हेकर, पप्पूदादा बानेकर, उप सरपंच गुरुदत्त आबा कारले, भूषण कारले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल कारले यांनी केले.