सावधान! खडकवासला धरणाच्या पाणलोट परिसरात खानापूर येथे आढळले मगरीचे पिल्लू

 खानापूर: काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर आढळून आली हाेती. त्यानंतर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये खानापूर गावातील पाणवठ्याजवळ एक ४ महिन्यांचे वाढ झालेले मगरीचे पिल्लू आढळले असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात घाबरहाटीचे वातावरण बनले आहे. वनविभागाने नागरिकांच्या मदतीने या मगरीच्या पिलाला पकडले असून ते त्या पिल्लाला कात्रज प्राणी संग्रहालयाच्या ताब्यात दिले आहे. 


खडकवासला धरण पाणलोट परिसरात खानापूर, मालखेड व इतर काही गावांतील नागरिकांना मगर दिसत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा वन विभागाकडे यापूर्वी आलेल्या आहेत. यापूर्वीही २०१३ साली खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला  मगर आढळून आली होती. त्यामुळे खडकवासला धरण परिसरात अजूनही काही मगरींचा अधिवास असण्याची शक्यता वनविभाग वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या भागात येणारे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभाग व पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


खडकवासला धरणक्षेत्राच्या ज्या परिसरात मगरींचे वास्तव्य आहे, तिथे सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. या मगरींचा कोणाला त्रास होत नसला तरी नागरिक त्या परिसरात जाऊ नयेत, म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.