"मी सभासद असून मला कन्यारत्न योजनेचा लाभ मिळाला नाही" शरद पवार यांची गमतीदार तक्रार

sadhana-sahakari-bank-Funny-complaint-of-Sharad-Pawar

सिंहगड टाईम्स च्या व्हाट्स अ‍ॅप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 

पुणे: काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या साधना सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय उद्घाटन,साडेसतरा नळी शाखा स्थलांतर समारंभ व लोकनेते स्वर्गीय मा.खा.विठ्ठलराव तुपे (पाटील) पुर्णाकृती पुतळा अनावरण समारंभात आदरणीय शरद पवार साहेबांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमातील भाषणात गंमतीने एक मुद्दा उपस्थित केला होता.  


आदरणीय पवार साहेब साधना सहकारी बँकेचे फार पूर्वीपासून सभासद आहेत आणि साधना बँकेतर्फे सभासदांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे 'कन्यारत्न योजना', याद्वारे केवळ एकच मुलगी असलेल्या सभासदांसाठी वीस हजार रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ मला मिळाला नाही अशी गमतीदार तक्रार साहेबांनी आपल्या भाषणात केली.


या गंमतीचा धागा पकडत आज साधना सहकारी बँकेच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या नावे सदर योजनेंतर्गत धनादेश अदा करत साहेबांना सुपूर्द केला. आणि यानिमित्ताने साधना सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी 3 मुलींना शिष्यवृत्ती योजना सुरू करत असल्याची माहिती यावेळी साहेबांना दिली. तसेच बँकेच्या वतीने 'शरद पवार गुणवंत कन्यारत्न पुरस्कार' देण्यात येणार आहे. बँकेच्या सभासदांच्या मुली दहावी-बारावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवतील त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल. दहावीच्या २ व बारावीच्या ३ गुणवंत विद्यार्थिनींना गौरविले जाईल.


याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर साहेब, बँकेच्या सुकाणू समितीचे सदस्य  दिलीप आबा तुपे, बँकेचे चेअरमन अनिल तुपे, संचालक चंद्रकांत कवडे, कार्यकारी संचालक भाऊ तुपे आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.