डोणजे: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिंहगडावरील जुन्या बंगल्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. एकावेळी साधारणपणे ३५ पर्यटकांची सोय या ठिकाणी करण्यात आली असुन रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिंहगडावरील जुन्या बंगल्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. एकावेळी साधारणपणे ३५ पर्यटकांची सोय या ठिकाणी करण्यात आली असुन रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खासदार सुप्रियाताई सुळे यांनी किल्ले सिंहगडाची पाहणी केली. ऐतिहासिक, भौगोलिक दृष्टीकोनातून संपूर्ण किल्ला फिरून यावेळी किल्ला, तळात उतरणाऱ्या चोरवाटा वगैरे बाबींची सुप्रिया ताईंनी माहिती करून घेतली. Sinahgad News
संपूर्ण पुणेकरांना आपलंसं वाटणारं हक्काचं ठिकाण म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगत आभिमानाने उभा असणारा 'किल्ले सिंहगड'. इतिहास आणि सिंहगड खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. पुणेकर मंडळी अथवा महाराष्ट्रातील हाडाचे ट्रेकर्स आवर्जून किल्ल्यास भेटी देत असतात. सिंहगड खोऱ्यातील कित्येक मंडळीना या पर्यटनातून उत्पन्न निर्माण होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १७ ऑगस्ट रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला होता.
मेक माय ट्रिप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार
एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रिप आणि गो आय बिबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरून कोठूनही बूक करता येणार आहेत. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे.
यावेळी सुप्रियाताई यांसह मा. जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे, वरिष्ठ वन अधिकारी राहूल पाटील साहेब, इतिहासतज्ज्ञ नंदकिशोर मते, मा. सरपंच कोंढाणपूर विश्वनाथ मुजमले, मा. सरपंच कल्याण राजेंद्र डिंबळे, अमोल पढेर हे सहकारी उपस्थित होते.