पुणे: ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मिस्टर मिस व मिसेस महाराष्ट्र 2021 या स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षक(ज्युरी) म्हणून ताज इवेंट्स अँड प्रोडक्शनच्या ब्रँड अँबेसिडर पिया राय, फैशन डिजाइनर मतीन राजा, सन स्टूडियो चे ओनर मैक्सी मिलियन, प्रोफेसर राम्या नायर, ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक व ताज मिस्टर मिस व मिसेस स्पर्धेचे आयोजक परेश वैद्य उपस्थित होते. या महा अंतिम फेरी मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 60 महिला तसेच पुरुष स्पर्धकांनी आपले टॅलेंट सादर केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन पाटेकर व निषीगंधा कुंटे यांनी केले. ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शन या संस्थेतर्फे आतापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या स्पर्धेच्या मिस्टर कॅटेगरीमध्ये संस्कार वाडकर प्रथम विजेते झाले तर फर्स्ट रनर अप डॉक्टर सागर तोरसकर, सेकंड रनर अप प्रशांत जाधव, थर्ड रनर अप नवनाथ सानप विजेते ठरले. फॅशन शो स्पर्धेच्या मिस कॅटेगरीमध्ये तन्मया काळे प्रथम विजेत्या झाल्या तर फर्स्ट रनर अप मनाली अड़ाके, सेकंड रनर अप अंकिता भट्टाचार्य, थर्ड रनर अप प्रियंका सानप विजेत्या झाल्या.
मिसेस गोल्ड कॅटेगिरी मध्ये श्रद्धा भावठणकर प्रथम विजेत्या झाल्या तर फर्स्ट रनर अप तींतुमोल चव्हाण, सेकंड रनर अप अश्विनी चव्हाण, थर्ड रनर अप सुषमा सुतार झाल्या. मिसेस प्लॅटिनम कॅटेगरी मध्ये रेणू अग्रवाल प्रथम विजेत्या झाल्या तर फर्स्ट रनर अप अनिता क्षीरसागर, सेकंड रनर अप संदीपा जना, थर्ड रनर अप पूनम भावसार झाल्या.
सर्व विजेत्या स्पर्धकांना क्राउन व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच या शोसाठी मुग्धा देशपांडे व प्रशांत जाधव यानी फॅशन शोची कोरियोग्राफी केली आणि ग्रूमर म्हणून स्कूल ऑफ एलिगेंस (फैशन एंड मॉडलिंग, पेजेंट ग्रूमिंग स्कूल) चा पिया रॉय, शोनी विर्दी , डॉ. हेमलता रोकड़े, स्मिता सोनावणे यांनी काम पाहिले. तसेच फोटोग्राफी पार्टनर म्हणून तनिष्क फोटोग्राफीचे अविनाश, चेतन देवधर, किशोर फोटोग्राफीचे किशोर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे गिफ्टिंग पार्टनर म्हणून अमाताज क्राफ्टेड प्रीमियम चॉकलेट, चंदूकाका सराफ, हव्या आयुर्वेद होते. कार्यक्रमाचे मेकअप पार्टनर म्हणून चैत्राली निंबाळकर यांचे सी मेकअप अकादमी होते. विविध पोशाख परिधान केलेल्या मॉडेल्स स्पर्धकांनी आपले कौशल्य स्टेजवर सादर केले.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात व नटलेल्या महिला व पुरुष स्पर्धकांनी आपले रॅम्प वॉक सादर केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टनसिंगचे सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.