'इंडियन आयडल- मराठी' या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून दिसणार 'अजय अतुल' - भित्तिचित्राद्वारे पुण्यात केली घोषणा!

Ajay-Atul-to-appear-as-examiner-of-Indian Idol-Marathi-program-Announcement-made-in-Pune-through-graffiti


पुणे: सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे 'इंडियन आयडल - मराठी'! कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'इंडियन आयडल - मराठी' ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षणही संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत. पुण्यात नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली या वेळी पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्री. अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री.अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते. 


आपल्या संगीताचं  गारुड या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच आशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढलं आहे.


'अजय-अतुल' या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती  दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला 'अजय-अतुल' हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू झाल्या आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 


'इंडियन आयडल - मराठी' लवकरच पाहा, सोनी मराठी वाहिनीवर!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.