पुणे: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारु सुरु आहे
"आयकर खात्याने कुठे छापे मारावेत हा त्यांचा अधिकार आहे. माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचा कर वेळच्यावेळी योग्य पद्धतीने भरलेला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याबाबत मला काही बोलायाचं नाही. पण माझ्या तीनही बहिणींशी संबंधित कंपन्यांवरसुद्धा छापे मारण्यात आले आहेत. माझे कुटुंबिय म्हणून फक्त छापे मारणं हे खालच्या पातळीचं राजकारण आहे. अनेक सरकारं येतात जातात. पण जनता सर्वस्व आहे," असं अजित पवार यांनी याबाबत म्हटलंय. "माझ्या बहिणींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कंपन्यांशीही त्यांचा काही संबंध नाही, केवळ त्या माझ्या बहिणी आहेत, रक्ताचं नातं आहे म्हणून धाड टाकली हे दुःख देणारं आहे," असंही अजित पवार म्हणाले आहेत.