भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले, त्यानंतर दुसऱ्या बोटीतून परतले

 


पुणे: पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कासारसाई धरणावर गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते. यावेळी अचानक तराफ्याचे इंजिन बंद पडले. कासारसाई धरणाच्या मधोमध पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडले. अखेर दुसऱ्या बोटीत रवानगी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.


दुसऱ्या बोटीतून पुढचा प्रवास चालकाने इंजिन सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण ते सुरु होईना. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली. त्यानंतर अजितदादा दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.


अजितदादांच्या सूचनेकडे कारकऱ्यांनी आणि नेत्यांनी दुर्लक्ष केले. सुरुवातीलाच अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका, अशी तंबी दिली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.