सध्या पशुधनाला ‘लंपी स्कीन ’ नावाचा विषाणूजन्य आजार जडत आहे. पशुधनाच्या अंगावर फोड येणे, फोड फुटणे, तोंडातून लाळ येणे, चारा न खाणे, ताप आदीने पशुधनाला जखडले आहे. त्यातच उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधी नसल्याने पशुपालकाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्याच्या पशुपालकातून तक्रारी आहेत. सध्या ग्रामीण भागात शेकडो पशुधनाला ‘लंपी स्कीन’ हा विषाणूजन्य आजार झाला असल्याचे समोर आले आ
हे.
"निसर्गचक्रामुळे शेतीतून मिळकतीचा काही भरवसा राहिला नाही. म्हणून शेतकरी शेतीसाठी काम, विक्री व दुग्धव्यवसायासाठी पशुधन संगोपन संवर्धन करतो. ‘लंपी स्कीन आजारावरील औषधीसाठी मोठा खर्च लागत आहे. निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी बाधित जनावरे वेगळी बांधावीत तसेच आपल्या जनावरांना लंपी आणि लाळ रोगांचे मोफत लसीकरण करून घावे" नावनाथ पारगे - मा. जिल्हा परिषद सदस्य
गाई व म्हशी मधील सर्व वयाच्या जनावरांना लंपी स्कीन डिसीज हा त्वचारोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण साधारणतः १० ते २० टक्के असून मृत्युदर १ ते ५ टक्के इतका असतो. या विषाणूचे शेळ्या-मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले, तरी हा आजार शेळ्या-मेंढ्यांना होत नाही. देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मानवास जनावरांपासून हा आजार होत नाही.