लायन्स क्लब ऑफ पुणे विजडम व जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एलआयसी एजेन्ट व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी संपन्न

Health-check-up-for-LIC-agent-jointly-by-Lions-Club-of-Pune-Wisdom-and-Jehangir-Hospita

 पुणे: नेहमीच इतरांच्या आर्थिक व शारीरिक आरोग्यासाठी झगडणाऱ्या विमा प्रतिनिधी चे मात्र आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि कौटुंबिक समस्या निर्माण होते. म्हणूनच खास त्यांच्यासाठी विविध आरोग्य तपासणी चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.


       लायन्स क्लब ऑफ पुणे विजडम आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील हॉस्पिटलमध्ये या शिबिराचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते, यामध्ये ९०पेक्षा जास्त लोकांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या आणि तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये बोन डेन्सिटी (मशीन द्वारे ),एक्स रे , ईसीजी ,आरबीएस (रॅन्डम ब्लड शुगर), बीएमआय (मशीन द्वारे )- बॉडी मास इंडेक्स..शरीरातील विविध फॅट ,मसल ,water लेव्हल ,शरीराचे वय,डब्ल्यूएचआर - वेस्ट हिप रेशो,बीपी (blood pressure),Random blood sugar, दंतचिकित्सा (screening with intraoral advance camera),डॉक्टरांचे मार्गदर्शन,जनरल फिजिशिअन, ( ब्लड प्रेशर, डायबेटिस, धाप लागणे, इन्फेक्शन,acidity,हृदयरोग, इतर सर्व प्रकारच्या समस्या व त्यावरील उपचार),ऑर्थोपिडीक  (हात पाय दुखणे, मुंग्या येणे ,फ्रॅक्चर, सांधा निखळणे, वाकडी व न जुळलेली हाडे, संधीवात, कंबरेचे दुखणे, जन्मजात व्यंग, हाडांचे इन्फेक्शन, व इतर सर्व प्रकारचे अस्थी दोष) आदी चाचण्यांचा समावेश होता.


       यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन महेश गायकवाड, खजिनदार ला.प्रकाश कुलकर्णी, ला.सीमा कुलकर्णी, ला.सुशीला गायकवाड, वरिष्ठ ला.डॉ. विलास कुलकर्णी, ला.गणेश आणेराव यांच्यासह एलआयसी एजेन्ट्स संघटनेचे सचिव रमेश कांबळे, संघटक सचिव संजय नवघणे, महिला अध्यक्षा सौ वैशाली महाडिक, एलआयसी 95एल शाखा अध्यक्ष भरत पवार व एजेन्ट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबीर आयोजित करण्यामध्ये मधुरा दाते व तुषार वऱ्हाटे यांचा सिंहाचा वाटा होता तर डॉ अवधेश शर्मा, डॉ अमर जाधव, डॉ पुष्कर देशपांडे आणि अन्य डॉक्टर व सहकारी यांच्या सक्रिय सहकार्यामुळे शिबीर यशस्वी झाले. यापुढे देखील महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.