कोल्हेवाडी चौकाचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक असे नामांतर

 


खडकवासला: पुण्यनगरीचा भाग असलेल्या सिंहगड रोडला सिहगडामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. कारण शिवकालीन अश्या इतिहासात सिहगडाला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने शिवप्रेमींच्या मनात याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकाचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक असे नामांतर करण्यात आले. 


क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाच्या कोनशिलेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जेव्हा या देशाला छत्रपतींच्या स्वातंत्र प्रेरणेची गरज होती तेव्हा मात्र महाराष्ट्र शिवाजी नावाच्या वादळाला विसरला होता. तेव्हा जोतिबा फुलेंनी रायगडावर भग्नावस्थेतील शिवसमाधी जगासमोर आणुन देशाला स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भरणारं शिवाजी महाराज नावाचं अमृत पाजलं. हे जोतिबांचे महाराष्ट्राच्या शिवभक्तांवरील उपकार म्हणावे लागतील. जोतिबांनी शिवरायांवर आधुनिक युगातला पहिला पोवाडा लिहीला आणि क्रांतीची आग आपल्या शब्दातुन तेवत ठेवली.


या वेळी रूपालीताई चाकणकर, सरपंच सौरभनाना मते, सागर कोल्हे, मा.सरपंच विजय कोल्हे, बारामती मतदार संघ अध्यक्ष सुरेश मते, मुरलीधर मते, आनंद मते, पुनम मते, शंकर कोल्हे आदी उपस्थित होते. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.