"माझा सिंहगड माझा अभिमान" स्थानिकांना रोजगाराच्या संधी; पुजा नवनाथ पारगे यांच्या पाठपुराव्याला यश

"माझा सिंहगड माझा अभिमान" स्थानिकांना रोजगाराच्या संधी; पुजा नवनाथ पारगे यांच्या पाठपुराव्याला यश

डोणजे: आपल्या सर्वांचा अभिमान असणाऱ्या किल्ले सिंहगडाला शिवकालीन वैभव प्राप्त करुन देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या सिंहगड विकास आराखडा कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते किल्ले सिंहगड व परिसरातील पर्यटनास चालना देणाऱ्या 'माझा सिंहगड,माझा अभिमान' हा उपक्रम आणि वन विभागाच्या वन्यजीव प्राणी सप्ताहाचे उद्घाटन झाले. तसेच उभारण्यात येणाऱ्या नव्या फूड स्टॉल्सचे उदघाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले.


 खासदार सुप्रिया सुळे यांची या विकास आराखड्यास असणारी आग्रही भूमिका याचसोबत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य तथा महिला बालकल्याण सभापती पुजा नवनाथ पारगे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमास मूर्त स्वरूप आले. त्यानुसार किल्ले सिंहगड व परिसराच्या ऐतिहासिक-पुरातन वारशाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास या अंतर्गत करण्यात येणार आहे.


पुणे शहराचा पाठीराखा व नेहमीच इतिहासप्रेमी व पर्यटकांनी बहरून गेलेल्या आपल्या गडावर पर्यटनाच्या दृष्टीने विकास कसा करता येऊ शकतो याबाबत गेली काही दिवसांपासून विविध पातळ्यांवर विचार विनिमय सुरु होता त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांचा नवनाथ पारगे, वन विभागाचे अधिकारी, परिसरातील तज्ज्ञ, आणि मान्यवर व्यक्ती यांच्यासह सिंहगडाचा पाहणी दौरा पार पडला होता. 


"सिंहगडाचा इतिहास आणि इतर बाबींची पर्यटकांना अभ्यासपूर्ण व रोचक माहिती मिळावी यासाठी गाईड ट्रेनिंग सुरु करण्यात येणार आहे. तसेच इथे पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी नवे फूडस्टॉल्स देखील उभारण्यात येणार असून त्यामाध्यमातून पर्यटकांना सुविधा तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे"  नवनाथ पारगे, मा. जिल्हा परिषद सदस्य 


काल संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय अजितदादा पवार सन्माननीय सुप्रियाताई सुळे, खडकवासाला आमदार भीमराव अण्णा तापकीर, जि. प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, महिला बालकल्याण सभापती पुजाताई पारगे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, मा. आमदार कुमारभाऊ गोसावी, मा. जि. प. उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, मा. नगरसेवक विकास दांगट,  मा. शहराध्यक्ष स्वातीताई पोकळे, नगरसेविका सायलीताई वांजळे, खडकवासाला विधानसभा ग्रामीण अध्यक्ष त्र्यंबकअण्णा मोकाशी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब पारगे, जि. प. अनिताताई इंगळे, खडकवासाला कार्याध्यक्ष सुरेश गुजर, मा. नगरसेवक शैलेश चरवड, नवनाथ पारगे, वन विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.