सुरेखा दमिष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त नवदुर्गांचा सन्मान व 'क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा' कार्यक्रम उत्साहात संपन्न

 


धायरी: धायरीच्या पहिल्या महिला सरपंच, तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, पुणे शहराच्या राष्ट्रवादी  महिला काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माजी अध्यक्षा सुरेखा दमिष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त १५ ऑक्टोबर २०२१ रोजी नवदुर्गांचा सन्मान व  क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील धायरीतील सूर्यगंगा सोसायटी येथे करण्यात आले होते.


प्रसिद्ध निवेदक आर जे अक्षय यांचा क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन खास महिलांसाठी करण्यात आले होते. यामध्ये विविध गीतांवर कलाकारांनी नृत्य व गायन सादर केले. या खेळ पैठणीचा कार्यक्रमांमध्ये दिपाली लोणारे या पैठणी साडीच्या विजेत्या ठरल्या. द्वितीय विजेत्यां प्रतिभा वेताळ यांना सोन्याची नथ व तृतीय विजेत्या सुनंदा थोपटे यांना चांदीचे पैजण देण्यात आले. कार्यक्रमातील  उत्तेजनार्थ महिलांना दहा बक्षिसे ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच राजकीय क्षेत्रातील महिलांनीही काही काळ या महिलांमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमास धायरी परिसरातील महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. 


 विविध मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.यावेळी संध्या गिरमे ,शकुंतला मुरुडकर, सोनाबाई  ढेबे, सुलभा झरांडे, रुपाली बनकर, कमल बेलकर, मंगल मेंगडे, सारिका पोकळे, जाई काळभोर, अर्चना पाटील, सुरवंता करडे या नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


 या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्वाती पोकळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा सुनिता डांगे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंगनाना चव्हाण, भावना पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रभावती भुमकर, तृप्ती पोकळे, संदीप पोकळे, दशरथ मनेरे, विकास कामठे, सुशांत पोकळे ,शिवसेनेच्या खडकवासला मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख नितीन वाघ, आनंद मते, सचिन पोकळे, खडकवासल्याचे माजी सरपंच विजय कोल्हे, नितीन वाघ, महेंद्र भोसले, प्रतीक पोकळे, शोभा पोकळे, सुलभा जरांडे, राजेशाही हॉटेलचे संचालक निलेश दमिष्टे, रुपेश दमिष्टे, वैशाली दमिष्टे, श्वेता खेडेकर, सारिका पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.