पुणे: पुणे जिल्हा परिषद मार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या जनजागृती लघुपटाचे विमोचन व बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी तयार केलेल्या चाईल्ड हेल्थ ट्रॅकींग सिस्टीमचे अनावरण महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. बालकांच्या आरोग्य तपासणी साठी तयार केलेल्या चाईल्ड हेल्थ ट्रॅकींग सिस्टीमचे अनावरण व लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेने कौटुंबिक हिसांचार प्रतिबंध व जनजागृती वर तयार केलेल्या लघुपटाचे चे विमोचन कार्यक्रम आज पुणे जिल्हा परिषद येथे पार पडला.
पुणे जिल्हा परिषद मार्फत बालमृत्यू आणि माता मृत्युदर कमी करण्यासाठी एक नवीन योजना बनवली आहे. या उपक्रमात, ती गर्भवती झाल्यापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आणि त्यापुढेही तिच्यावर लक्ष ठेवले जाईल. जेणेकरून मुलाला वेळेवर लसीकरण आणि पोषण प्रदान करता येईल. हे मुलांना कुपोषणापासून वाचवू शकते. या अभियानात अभियानात मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम (MCTS) अंतर्गत महिलांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर गोळा आणि अपडेट केली जाईल.
या वेळी बोलताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याविषयीच्या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे. तसेच राज्यभर कुपोषित बालकांची शोधमोहीम व जनजागृती चळवळ वर्षभर लोकसहभातून नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे राबविली जात आहे. तसेच तसेच महाराष्ट्रात कुपोषित बालकांची शोधमोहीम व जनजागृती चळवळ लोकसहभागातून नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे राबविली जात आहे. मोहीमे अंतर्गत आपण पंधरा लाख ७६ हजार दूरध्वनी, चार लाख ५९ हजार मेसेजेस, सहा लाख ३१ हजार ब्रॉडकास्ट मेसेज, तसेच दहा लाख व्हाट्स ॲप वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होत्या. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पुणे जिल्हा परिषदेने बालकांचा आरोग्य पोषण विषयक दर्जा उंचावण्यासाठी ट्रॅकींग ॲप व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याची शॉर्ट फ्लिमद्वारे जनजागृती करण्याचा हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. तसेच त्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा पारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.