पुणे: साईश्री हॉस्पिटल, औंधने गुडघ्याच्या समस्यांनी त्रस्त आपल्या रुग्णांना संपुर्ण स्वयंचलित रोबोटिक प्रणालीशी अवगत केले आहे. हॉस्पिटलने पश्चिम भारतातील फुल ऑटोमॅटीक रोबोटिक सिस्टीमद्वारे गुडघ्यांच्या १०० शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. ऑर्थोपेडिक आरोग्यसेवेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी हे हॉस्पिटल नवीनतम तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम तज्ञांनी सुसज्ज आहे. या सर्व शस्त्रक्रिया महाराष्ट्राच्या एकमेव व ऑटोमॅटीक अक्टिव्ह रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टम द्वारे केल्या गेल्या.
भारतात शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञान हे गेमचेंजर होते असे म्हणता येईल. भारतात आज हे तंत्रज्ञान विस्तारत आहे. या तंत्रज्ञानाने रुग्णांना जागतिक दर्जाच्या सेवा आणि इच्छित परिणाम देऊन सर्जिकल व्यवसायाला उच्च पातळीवर नेले आहे. या प्रगत नेक्स्ट-जनरेशन तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राला नवीन मार्ग मिळाले आहेत, आणि अशी अपेक्षा आहे की रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे भारताच्या आरोग्यसेवा उद्योगात मोठी वाढ होईल, आणि एक नवीन आणि प्रगत युगाची सुरूवात होईल.
तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स इन्जुरी सर्जन डॉ.नीरज आडकर म्हणाले, “ रोबोटिक्स सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजंस हे नवीन तंत्रज्ञान अतिशय सुस्पष्ट, अचुक आणि आशादायी आहे .रुग्णांचे विशिष्ट थ्री डी बोन मॉडेल विकसित करण्यासाठी सीटीस्कॅन इमेजसची मदत घेतली जाते. आणि याच्या मदतीने प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळी म्हणजेच पर्सनलाईज्ड वर्च्युअल सिम्युलेशन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते. आणि ती सुद्धा सब मिलिमीटर डायमेंशन्ल अचूकतेसह. या तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिये नंतरचे सर्वोत्तम परिणाम मिळण्यास मदत होते. शिवाय या बदलत्या तंत्रज्ञानाने रुग्णांना त्यांचे पुर्व-जीवनमान सहज परत मिळते.
डॉ. आडकर पुढे म्हणाले, सीयुव्हीआयए (CUVIS) जॉइंट रोबोटिक तंत्रज्ञानाचे काही फायदे म्हणजे ऊतींचे (टिश्युज) कमी नुकसान आणि कमी रक्तस्त्राव, लवकर रिकव्हरी, रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज आणि योग्य इम्प्लांटसह शस्त्रक्रिये वेळी योग्य पद्धत्तीने होणारी कटिंग. हे प्रगत तंत्रज्ञान हेल्थकेयर मधील निर्धारीत सीमांच्या पलिकडे जाऊन आमच्या रुग्णांना व गंभीर आर्थरायटिस ने ग्रस्त असलेल्यांना सक्रिय जीवनशैली परत मिळवुन देण्यासाठी सुसज्ज आहे.
क्युविस रोबोट, पश्चिम भारतातील एकमेव पूर्णपणे स्वयंचलित आणि प्रगत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टम आहे, जी साईश्री हॉस्पिटलमध्ये जॉईंट पेनचा सामना करणाऱ्या आणि समस्यांशी लढणाऱ्या रुग्णांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी स्थापित केली गेली आहे.