आनंद ‘गगनात’ मावेना! नवरात्री निमित्त आयोजित लकी-ड्रॉ विजेत्या ९ महिलांना हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन

आनंद ‘गगनात’ मावेना! नवरात्री निमित्ताने लकी-ड्रॉ विजेत्या ९ महिलांना हेलिकॉप्टर राईडद्वारे पुणे दर्शन


 पुणे: नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लकी-ड्रॉ स्पर्धेत सहभागी झालेल्या ९ भाग्यवान महिलांनी मोफत हॅलिकॉप्टरची सफर केली. खडकवासला गावाचे सरपंच सौरभ मते यांनी या उपक्रमाचे आयोजन केलं होतं. महिलांना हेलिकॉप्टरची सफर करण्याची संधी मिळाली. उंच आकाशात हेलिकॉप्टरमधून तब्बल २० मिनिटे वेळे घालवून या महिलांना पुणे दर्शन करण्यात आले. त्यामुळे या महिलांचा आनंद ‘गगनात’ मावेनासा झाला.


घरगुती गौरी गणपती सजावटीच्या बक्षीस वितरण समारंभाच्या तसेच नवरात्रौत्सवानिमित्त खडकवासला परिसरात खडकवासला गावाचे सरपंच सौरभ मते यांनी लकी-ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी बक्षीस म्हणून ९ भाग्यवान महिलांना हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यात भाग्यवान विजेत्या ठरलेल्या ९ महिलांना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार लकी-ड्रॉ स्पर्धेत विजेत्या झालेल्या महिलांनी आज हेलिकॉप्टर सफर केली. या लकी-ड्रॉ स्पर्धेला खडकवासला परिसरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. 


स्नेहल राजेश पडवळ, धनश्री मते, गायत्री वृषभ पवार, दीपाली नामदेव खरमाटे, सायली कोल्हे, धनश्री सोपान जाधव, संगीता संदीप मोकाशी, शीतल अक्षय राजपुत आणि विद्या मते या नऊ भाग्यवान विजेत्या महिलांचे हे स्वप्न साकारही झालं होतं. विजेत्या महिलांना हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात आलं होतं. हवेत उडण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्हाला खूप आनंद झाला, अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली होती.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.