पुणे: शालिनी फाउंडेशन व डेकालीप तर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2021 सीझन 2 पुरस्कार सोहळा पुण्यातील खराडी येथील हॉटेल रेडिसन येथे नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयर्न मॅन पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील 22 व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात आयर्न मॅन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनाही महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात विविध हिंदी मराठी गीतांचे सादरीकरण कलाकारांनी उत्कृष्टपणे सादर केले.
आपल्या भाषणात बोलताना कृष्णप्रकाश म्हणाले की ,"आज आपल्या देशात ज्या पद्धतीने तरुणांची संख्या वाढत आहे हे आपल्यासाठी शक्ती पण बनू शकते व प्रसंगी धोकादायक पण बनू शकते. शक्ती यासाठी की आपल्याकडे युवकांचा मोठा ग्रुप असेल व जगातील सर्वाधिक युवक आपल्या देशात आहेत. पण धोकादायक यासाठी की त्यांना चांगले मार्गदर्शन नसेल किंवा त्यांनी चांगल्या कामांमध्ये भाग नाही घेतला तर ते पुढे टाईम बॉम्ब बनतील.तेच लोक पुढे अवैध मार्गाला लागतील. आजचे युवक जर आजच्या पुरस्कार आयोजित करून सामाजिक काम करत असतील तर समाज योग्य दिशेने वाटचाल करीत राहील. जर युवकांना चांगले मार्गदर्शन मिळाले तर हे युवक पुढे चांगली प्रगती करू शकतील.
आपल्या भाषणात शालीनी फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल गोरे म्हणाले की, गेल्या 22 वर्षांपासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. आईच्या निधनानंतर मी आईच्या नावाने शालिनी फाउंडेशन ही सामाजिक संस्था सुरु केली आहे. शालिनी फाउंडेशन तर्फे गरीब लोकांना भोजन व कपडे वाटप, अनाथालयाला मदत तसेच करुणा महामारी 103 कुटुंबांना दोन महिन्याचे रेशन वाटप केले आहे. डॉक्टर, वकील, पोलीस, चित्रपट क्षेत्र व विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार द्यावेत जेणेकरून इतर लोकांना सामाजिक कार्याचे प्रोत्साहन मिळेल म्हणून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सुरू केले आहेत. डेकालीप संस्थेचे संस्थापक अनिर्बन सरकार आहेत.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये चित्रपट अभिनेते सुरेश विश्वकर्मा, मॉडेल रोशनी कपूर, अभ्यंग कुवळेकर, मॉडेल व अभिनेत्री झेबा शेख, गोल्ड मेडलिस्ट दिक्षा मोरे, डान्स इंडिया डान्स च्या शांता पवार आजी, वर्ल्ड हॅन्ड रायटिंग कॉम्पिटिशन चे लक्ष्मण बावनकुळे , शालीनी फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल गोरे, क्रिसेंता प्रॉडक्शनच्या संचालिका व मॉडेल शोनी विर्दी, मोरया हॉस्पिटल चे संचालक अजित सिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.