अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते, पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते - शरद पवार


 सोलापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा कानोसा घेत आहेत. कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.  त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात चांगलीच टोलेबाजी केली. “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल”, असं शरद पवार म्हणाले.


पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर खात्याच्या धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर शरद पवारांनीही भाष्य केलं.


गेल्या वेळी शरद पवार पवार सोलापूर मध्ये असताना त्यांनी अमित शहांना डिवचले होते. त्यानंतर त्यांना ईडी ची नोटीस आली होती. त्यानंतर शरद पवारांनी ईडीला अंगावर घेतले होते. यावेळीही अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.