डोणजे: शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रणरागिणी महिला उद्योग समूह यांच्यामार्फत शिवगंगा खोऱ्यातील महिलांसाठी एकदिवसीय मोफत 'व्हेज चायनीज मेकिंग प्रशिक्षण' शिबीर आयोजित करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ महिला बालकल्याण सभापती पुजाताई नवनाथ पारगे यांच्या शुभहस्ते पार पडले.
शिवगंगा खोरे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा तथा रणरागिणी महिला उद्योग समूह संस्थापिका रेश्मा चोरघे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. स्थानिक महिला सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैशाली पवार यांनी मानले.