पानशेत धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांकडून लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध


किरकटवाडी: वांजळवाडी (नांदोशी) येथील पानशेत धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवानी लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध करत शेतकरी हत्या प्रकरणात दोषींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना ईमेलद्वारे पाठविले आहे.


आजच्या महाराष्ट्र बंद ला आपला पाठिंबा दर्शवित या शेतकऱ्यांनी हवेली तालुक्यातील वांजळवाडी, नांदोशी याठिकाणी एकत्र येत आपला निषेध नोंदवला. देशभरात शेतकऱ्यांवर अन्याय होत असून कृषिप्रधान देशात असे प्रकार घडणे ही खेदाची बाब असून पुरोगामी महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यात अशा घटनेस सामोरे जावे लागू नये असे यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्राम बचाव कृती समितीचे निमंत्रक महेश गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. वांजळवाडी गावचे शेतकरी सध्या त्यांच्या पुनर्वसन प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा शासन दरबारी करीत असून गेले 61 वर्षे झाले तरी शासनाने त्यांचा प्रश्न मार्गी लावलेला नाही, अशा प्रसंगी दुर्दैवाने जर आंदोलन करण्याची वेळ आली तर आमची देखील लखीमपूर सारखी स्थिती होऊ नये अशी भीती देखील यावेळी महेश गायकवाड यांनी व्यक्त केली यावेळी वांजळवाडी प्रकल्पग्रस्त शेतकरी निवृत्ती ठाकर, नंदू ठाकर, रविंद्र ठाकर, गजानन बिरामणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.