हिंजवडी: पुणे म्हटलं की, खवय्ये आणि जागो-जागी असलेले हॉटेल्स...त्यामुळे पुणेकरांचा हा खास जिव्हाळ्याचा विषय. धायरीचे युवा उदयोजक निलेश दमिष्टे यांनी राजेशाही हॉटेलच्या माध्यमातून सिहंगड रोड परिसरात खवय्यांसाठी ९ वर्षांपूर्वी राजेशाही हॉटेल चालू करून चांगलेच नावारूपास आणले. नोकरीच्या मागे न धावता आपणास आवडत्या व्यवसाय यातून प्रगती साधत राजेशाही हॉटेलचे मालक निलेश रमेश दमिष्टे आणि वैभव मते यांनी राजेशाही हॉटेल ची दुसरी शाखा हिंजवडी फेज 2 -3 येथील लक्ष्मी चौक येथे सुरु केली आहे.
२४ ऑक्टोबर रोजी राजेशाही हॉटेलच्या दुसऱ्या शाखेचा उदघाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संप्पन झाला. जेष्ठ विचारवंत, माईंड पॉवर ट्रेनर व लेखक डॉ दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते राजेशाही हॉटेलचे उदघाटन झाले. या वेळी तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता आपणास आवडत्या व्यवसायातून प्रगती साधावी व इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन डॉ. कोहिनकर यांनी केले तसेच राजेशाही हॉटेलच्या नवीन शाखेसाठी आणि निलेश दमिष्टे व वैभव मते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
हिंजवडी येथील राजेशाही हॉटेल मध्ये खवय्यांसाठी इंडियन, महाराष्ट्रीयन, पंजाबी, इंडियन व्हेज नॉन-व्हेज, चायनीज तसेच कॉंटिनेंटल चवीला पदार्थांची रेलरेल असणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी २५० लोकांसाठी पार्टी हॉलची सुविधाही उपलब्ध आहे.
हिंजवडी आय टी पार्क मधील अभियंत्यांसाठी हॉटेल राजेशाही येथे महाराष्ट्रीयन चिकन मटण आणि मासे, इंडियन व्हेज नॉन-व्हेज, चायनीज तसेच कॉंटिनेंटल चवीला लज्जतदार आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. आय टी पार्क मधील कामगार वर्गासाठी नवनवीन आणि आकर्षक अश्या ऑफर ठेवल्या जाणार आहेत असे निलेश रमेश दमिष्टे यांनी सांगितले.
या प्रसंगी धायरीच्या पहिल्या सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा रमेश दमिष्टे, वेल्हे तालुका पंचायत समितीच्या सभापती निर्मला जागडे, राजेशाही हॉटेलचे मालक निलेश रमेश दमिष्टे आणि वैभव मते, अंकुश पोकळे, गणेश (रुपेश) दमिष्टे, श्वेता दमिष्टे- खेडेकर, लता गांदले, टाटा मोटर्स युनियनचे रामराजे बेंबडे, सुलभा जरांडे, आशा मते, शारदा मते, खडकवासल्याचे माजी सरपंच राजेंद्र मते, रामभाऊ कलाटे, नरेंद्र टेमगीरे, राजेश पोकळे, भरत कुंभारकर, गोपालकृष्ण मते, माया मते, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, बाळासाहेब कुंभारकर, राजाराम पाटील, सतीश कोरडे, राजेश जगदाळे, राहुल कामठे, हनुमंत चव्हाण, प्रा.राजेश जाधव, ललित बावडेकर, राहुल शिंदे, शैलेश मोरे, उत्तम कलाटे, राम कलाटे, संतोष जांभुळकर, अमर आखाडे, राहुल खेडेकर, रवी देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेशाही हॉटेलच्या पार्सल आणि पार्टी हॉल बुकिंग साठी 9175913942 या क्रमांकावर संपर्क साधावा.