पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा पुढाकार

 


संपर्क प्रमुख सचिन अहिर यांची पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला नवीन दिशा देण्यासाठी पर्यटन मंत्र्यांचे माध्यमातून नवीन रणनीती...

मुंबई: पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आणि येथील मुबलक निसर्ग सपंदेचा जिल्ह्यातील स्थानिक पर्यटनाच्या दृष्टीने पुरेपूर वापर करण्यासाठी शिवसेनेचे नवनियुक्त संपर्क प्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर यांनी नवीन रणनीती आखली असुन शिवसेनेचे नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पुणे जिल्ह्यातील स्थानिक पर्यटन स्थळांचा पर्यटन विषयक विकास आराखडा राबविण्यासाठी गळ घातली असुन काल सोमवारी शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेऊन जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी कोणती पाऊले उचलायची या विषयी चर्चा करण्यात आली. संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या बळकटीकरणा बरोबरच स्थानिक पातळीवरील विकास कामांत पदाधिकारी यांचा सहभाग वाढविण्यावर भर देऊन जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांना नव्याने बळ देऊन राज्यातील सत्तेचा पुणे जिल्ह्यासाठी कसा उपयोग करता येईल या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली आहे. 


 शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेशी बैठक घडवून आणुन पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा आगामी काळात कशाप्रकारे विकास करायचा यावर चर्चा केली. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात माहिती घेऊन येत्या काळात या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे सुतोवाच केले. 


 पुणे जिल्ह्यातील राजगड, शिवनेरी,सिंहगड, तोरणा, कोरीगड सारखे गडकिल्ले आणि येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा आगामी काळात दर्जेदार विकास करून येथील स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाऊले उचलली असून पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा येत्या काळात चेहरा मोहरा बदलण्याची आता आशा निर्माण झालेली आहे.


पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यासह पुणे व पिंपरी- चिंचवड शहराचे लगतच्या सर्वाधिक पर्यटकांची गर्दी होणाऱ्या पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष केंद्रित केले असुन येथील पर्यटन स्थळे व लगतच्या गावांचा व परिसराचा पर्यटनाचे दृष्टीने कयापालट करण्यासाठी चांगले धोरण राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असुन त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. माजी मंत्री व शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी पुणे शहर व जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी खांद्यावर घेताच शिवसेनेचे मंत्री,नेते व स्थानिक पदाधिकारी यांच्यात सुसंवाद घडवून आणुन पदाधिकार्यांच्या माध्यमातून विकासाची गंगोत्री मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने पुणे शहर व संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटना आता कमालीची सक्रिय होऊ लागली आहे.



या वेळी माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे, रमेशबापु कोंडे, बाळासाहेब चांदेरे, पै.कुलदिप कोंडे, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी सचिन पासलकर, अविनाश बलकवडे, तालुका प्रमुख नंदकुमार काळभोर, गणपतबुवा खाटपे, रामदास धनवटे, सचिन खैरे, माऊलीशेठ खंडागळे, उपजिल्हाप्रमुख दादा मोहोळ, अमोल पांगारे, दत्ता जोरकर आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.