महाविकास आघाडीच्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर पुन्हा आमनेसामने आल्या आहेत.लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरही अमृता फडणवीसांनी टीका केलीय. आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केला.
अमृता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्वीट चाकणकर यांनी केलंय.