किरकटवाडी: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या ऐतिहासिक किरकटवाडी गावातील मुख्य चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष व शेकाप प्रदेशाध्यक्ष राहुलभाऊ पोकळे व खडकवासला गावचे सरपंच सौरभनाना मते यांच्या हस्ते करण्यात आले.
ऐतिहासिक किल्ले सिंहगड च्या पूर्वेस असलेल्या खडकवासला गावानजीकच्या किरकटवाडी गावच्या मुख्य चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची संकल्पना रोहितभाऊ हगवणे आणि मित्र परिवाराने सर्वांसमोर मांडली आणि भाऊसाहेब हगवणे यांच्या विशेष पुढाकाराने पुढे आली आणि चौकाचे नामकरण पार पडले. यावेळी किरकटवाडी गावचे सरपंच गोकुळ करंजावणे, किरण हगवणे,विजय हगवणे, दशरथ करंजावणे,पै.सुहास हगवणे, अविनाश हगवणे, कालिदास माने,राजेंद्र करंजावणे, भरत हगवणे, संतोष रिंढे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी सर्वांचे आभार मनसे उप तालुकाप्रमुख कालिदास चावट पाटील यांनी मानले.