वडगाव: गॅस, पेट्रोल व डिझेल ची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीने त्रस्त झालेली जनता, मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधात शद्दू ठोकून उभी रहात आहे. कोरोनामुळे उत्पन्नावर मर्यादा आली असताना सातत्याने होणारी दरवाढ ही निर्ढावलेल्या सरकारचा बेडगीपणा स्पष्ट अधोरेखित करत आहे. हे आंदोलन खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मा.काकासाहेब चव्हाण मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या वतीने वडगाव पूलाखाली गॅस महागाई विरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी "बस हो गई मेहंगाईकी मार, चलेजाव मोदी सरकार " अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
विविध विषयांवर धूळफेक करत व खोटी आश्वासने देताना भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. सत्तेत आल्यानंतर मात्र केवळ धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या सेवेत मोदी सरकार व्यस्त झाले. इकडे प्रचंड महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत. केंद्र सरकारच्या या तुघलकी कारभाराचा व वाढलेल्या प्रचंड महागाईचा निषेध करण्यासाठी आज खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खडकवासला ग्रामीण चे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, स्वातीताई पोकळे, सचिन बेनकर, सुरेश गुजर, कुणाल पोकळे, कुणाल वेडे, बाबासाहेब धुमाळ, प्रभावतीताई भुमकर, चंद्रशेखरदादा पोकळे, सुरेखा दमिष्ठे, नूरशेठ सय्यद, साहील कांबळे, सुनिल घुले, रोहिदास जोरी, साहिल कांबळे, तन्वीर शेख, समीर निरवणे, सुनीता डांगे, भावना पाटील, राजेश्वरी पाटील, योगिता नलावडे, तृप्ती पोकळे, प्रतिक पोकळे आंदोलनात सहभागी झाले होते .