डोणजे: माझा सिंहगड माझा अभिमान या नावे महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या सिंहगड विकास आराखड्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, स्थानिक आमदार श्री भिमराव अण्णा तापकीर, सभापती पुजाताई नवनाथ पारगे यांच्यासह उपस्थित असणारे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, वनरक्षक, वनअधिकारी या साऱ्यांच्या उपस्थितीत हा उदघाटन व गड पाहणी सोहळा संपन्न झाला.
हा कार्यक्रम पार पडल्यानंतर संध्याकाळी किल्ल्यावर वास्तव्यास असणारे नागरिक, स्टॉलधारक, व जीप वाहतूकदार बांधवांशी मा. जिल्हा परिषद सदस्य नवनाथदादा पारगे यांनी संवाद साधला. प्रशासन दरबारी सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने पाठपुरावा होत असून, आपल्या सर्वांच्याच मागणीला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन करत नवनाथदादा यांनी उपस्थितांना अश्वस्थ केले. या वेळी नवनाथदादा पारगे यांच्यासह मा. जि. प. उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे हे देखील उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांची या विकास आराखड्यास असणारी आग्रही भूमिका याचसोबत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य तथा महिला बालकल्याण सभापती पुजा नवनाथ पारगे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमास मूर्त स्वरूप आले. त्यानुसार किल्ले सिंहगड व परिसराच्या ऐतिहासिक-पुरातन वारशाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास या अंतर्गत करण्यात येणार आहे.