पुणे: “शनिवार वाडा हा शहराचा अनमोल वारसा आणि ऐतिहासिक मोलाचा आहे आणि त्याचे जीर्णोद्धार आणि संवर्धन लवकरच टप्प्याटप्प्याने होणार आहे हे खरोखरच स्वागतार्ह आहे,” असे माजी महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शनिवार वाड्याच्या दयनीय अवस्थेबाबत केंद्राने पत्राची दखल घेतली आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली जाईल असे अश्वासन दिले असल्याचे आमदार मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
८ नोव्हेंबर २०२१ रोजी टिळक यांना भारत सरकारच्या ईशान्य क्षेत्राचे सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री जी किशन रेड्डी यांचे पत्र मिळाले. त्यांनी मुक्ता टिळक यांच्या 1 सप्टेंबर 2021 रोजी ऐतिहासिक शनिवार वाडा किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्राला उत्तर दिले आहे.
“या प्रकरणाची तपासणी करण्यात आली आहे आणि किल्ल्याच्या तटबंदीचे संवर्धन आणि जीर्णोद्धार या वर्षी हाती घेण्यात आले आहे आणि त्याशिवाय दिल्ली दरवाजा येथील ऐतिहासिक पेंटिंगच्या जीर्णोद्धाराचे कामही लवकरात लवकर हाती घेण्यात येईल. एएसआय महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांच्या काळजी आणि संवर्धनासाठी स्मारकांच्या गरजेनुसार आणि संसाधनांच्या उपलब्धतेनुसार सर्व प्रयत्न करत आहे.
माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या यांच्या शनिवारवाड्याच्या जीर्णोद्धाराच्या घोषणेनंतर कोथरूडच्या माजी आमदार यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. मेधा कुलकणी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधत असतानाचा फोटो ट्विट केला होता. त्यात सांगितले होते की या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) September 3, 2021