पुणे: रंगीबेरंगी फुगे, शुभेच्छा पत्रके, नक्षीदार टोप्या यावेळी मुलांनी डोक्यात परिधान केल्या होत्या. हवेत फुगे सोडून मुलांनी यावेळी आनंद साजरा केला. तसेच याचबरोबर मुलांना खाऊचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिनेत्री मॉडेल मोनाली मोरे, ऍड संकेत मोरे, दीपक आवळे, अजय मोरे तसेच अलका फाउंडेशनच्या अलका गुंजनाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला रामकुमार शेडगे यांनी देवसासींच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व यावेळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अ.ब.क चित्रपटातील विविध अनुभव सांगितले. त्याच बरोबर मुलांना चित्रपटसृष्टीत विनोदी किस्से सांगून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मोरे यांनी केले तर आभार मोनाली मोरे यांनी मानले.