खडकवासल्यात महात्मा गांधींच्या ऐतिहासिक पाऊलखुणा: अमृत महोत्सवी महात्मा गांधी यांच्या प्रत्यक्ष भेटीच्या साक्षीदारांचा सन्मान



खडकवासला: पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी  भारतीयांना हाक दिली होती. " खेड्याकडे चला"  महात्माजींनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या राजकीय गुरूंच्या, गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून संपूर्ण भारताची यात्रा केली होती. त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामाच्या धावपळीत महात्मा गांधीजीनी १५ नोव्हेंबर १९४५ रोजी खडकवासल्यातील  'रोटरी क्लब'च्या ग्रामीण सुधारणा केंद्रास दिलेल्या भेट दिली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महात्मा गांधी यांच्या खडकवासला भेटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाची पूर्तता यानिमित्त स्मरण महात्म्यांचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदल्या गेलेल्या या क्षणाचे स्मरण करण्यासाठी आज खडकवासला व सभोवतालच्या गावातील महात्मा गांधींच्या भेटीचे प्रत्यक्ष साक्षीदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच महात्मा गांधी यांच्या खडकवासला भेटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाची पूर्तता यानिमित्त स्मरण महात्म्यांचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


 सेवाग्राम येथून स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली. तेव्हा तंत्रज्ञानही नव्हते, पारंतत्र्य असल्यामुळे सर्व बाजुंनी बंधने होती. प्रसाराची कोणतीही साधने नसतानाही स्वातंत्र्य संग्रामाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. एखाद्या ठिकाणी गांधीजी जाणार असे कळल्यानंतर नागरिकांची तिथे प्रचंड गर्दी व्हायची, गांधीजींना ऐकायला, पाहायला जनसागर उसळायचा. देशात १९४५ साली 'चलेजाव चळवळीच्या' वारे जोरात वाहत होते. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या हालचाली सुरु होत्या. या धामधुमीत महात्मा गांधीजीनी १५ नोव्हेंबर १९४५ रोजी त्यांनी 'रोटरी क्लब'च्या ग्रामीण सुधारणा केंद्रास दिलेल्या भेट दिली होती. सरदार वल्लभभाई पटेल व इतरही मंडळी हजर होती. या घटनेस आज सोमवारी ७६ वर्ष पूर्ण होत आहे. 


त्याकाळी खडकवासल्यात ग्रामीण सुधारणा केंद्रची कल्पना केंद्राचे सचिव एफ.पी.पोचा यांची होती. केंद्राच्या वतीने दवाखाना व सुतिकागृह(नसिंग होम) चालविले जात होते. चार वर्षे सुरू असलेले काम पाहण्यासाठी गांधीजी येथे आले होते. गांधीजींना असे कार्य कस्तुरबा गांधी निधीच्या माध्यमातून करावयाचे होते. सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.मुशिला नायर, मणीबेन पटेल, प्यारेलाल उपस्थित होते.


 गावच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदल्या गेलेल्या या क्षणाचे स्मरण करण्यासाठी आज खडकवासला व सभोवतालच्या गावातील 15 नोव्हेंबर 1945 रोजी महात्मा गांधी यांच्या भेटीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या मा ज्ञानेश्वर विष्णू मते, बायजाबाई धोंडीबा मोरे, धोंडीबा दशरथ सोनवणे, साधू सखाराम मते, सोपान लक्ष्मण मते, केशव हनुमंत करंजावणे, महादू हरी मते, जगन्नाथ धोंडीबा मते, रामचंद्र मारुती मते, अर्जुन जनाजी कोल्हे, ज्ञानेश्वर गणपत खिरीड, जगन्‍नाथ रामचंद्र मते, दिगंबर बाबुराव मते, निवृत्ती हरी मते, रामभाऊ रायकर, विठ्ठल तुकाराम बोडके, जीवन सोपान मते या मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह चरखा देऊन सर्वांचा सन्मान राजेश जी पांडे सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड ,मा भरत हलाडी निवृत्त कर्नल अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पुणे, मा राजेश देशमुख प्रसिद्ध पत्रकार, रोटरी क्लबचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.        

                             "गांधीजी गावात आल्याची माहिती आम्हाला होती परंतु त्या बाबत अधिकृत माहिती कुठे उपलब्ध होत नव्हती. आम्ही ‘सकाळ’च्या ग्रंथालयात आम्हाला 1945 सालच्या सकाळ मध्ये गांधीजी आले होत्या त्या कार्यक्रमाची बातमी सापडली. त्याबातमीतून खूप मोठी माहिती मिळाली. या बातमीच्याआमचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास सकाळच्या बातमीचा आम्हाला मोठा उपयोग झाला. त्या बातमीचा मोठी फ्रेम तुळशीदास मते यांनी ट्रस्टला दिली." -डॉ.नंदकिशोर मते, इतिहास अभ्यासक

तसेच गावातील महात्मा गांधी चौकामध्ये नवीन महात्मा गांधी चौक या नामफलकाचे उद्घाटन खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी काका चव्हाण अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला, मा जिल्हा परिषद सदस्य विलास मते, मा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोक मते, डॉक्टर नंदकिशोर मते, खडकवासला विधानसभा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल मते ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आनंद मते, मनसे खडकवासला अध्यक्ष विजय मते ,मा शिवसेना हवेली तालुका प्रमुख संदीप मते ,मनसे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अवधूत मते, बारामती लोकसभा उपाध्यक्ष सुरेश मते ,माजी सरपंच विजय कोल्हे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश मते, खडकवासला देवस्थान ट्रस्ट संचालक मुरलिधर मते ,सचिव विलास तुकाराम मते, मा हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राहुल घुले, खडकवासला विधानसभा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सचिन मोरे, मनसे सरचिटणीस अतुल मते ,राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष नीलेश मते, अध्यक्ष बाजीराव पारगे ,मा ग्रामपंचायत सदस्य संदीप मते, रामदास मते, अजय मते ,सोपान मते, दिलीप मते, शेखर मते, जीवन कोल्हे, साहेबराव मते, जीवन मते ,शिवाजी मते, लक्ष्मणराव रायकर ,अविनाश तिकोने तसेच अनेक   विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधु बहुसंख्येने ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते. मंदिराचे ट्रस्टी सुनिल मते हे ही आयोजनात आघाडीवर होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.