पुणे: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती यांच्या वतीने क्रांतिगुरु लहुजी पुरस्कारांचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे, ( उपसभापती विधान परिषद ), विजय डाकले ( अध्यक्ष आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती ), प्रशांत जगताप ( राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष ), आमदार निलेश लंके, आमदार राजू आवळे, गजानन तरकुडे (शिवसेना पुणे शहर प्रमुख) सचिन अहिर ( संपर्क प्रमुख पुणे जिल्हा ), रमेश बागवे ( पुणे काँग्रेस अध्यक्ष ) रमेश कदम (उप आयुक्त सामाजिक न्याय विभाग ) संजय मोरे, नगरसेवक बाबुराव चांदोरे, पृथ्वी सुतार ( शिवसेना पुणे शहर प्रमुख ) बाळासाहेब भांडे, अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाऊ सोनवणे, अस्मिता जोगदंड, शैलेश लोखंडे, योगेश दोडके, डॉ पद्माकर कोल्हे, अनिल शिंदे, शंकर तडाखे, सुभाष जगताप, हनुमंत साठे, शरद गायकवाड, डॉ मिलिंद आव्हाड, मच्छिंद्र सकटे, सागर शिंदें, नाथाभाऊ कसबे, मयूर भाटे, दिलीप आगळे यांना क्रांतिगुरु लहुजी पुरस्कार देवून सन्मान ३० पुरस्कार्थींचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रशांत जगताप म्हणाले की क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांच्या स्मारकासाठी आघाडी सरकारने १०४ कोटी रुपये वर्ग केले आहेत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूज होणार आहे. तसेच बागवे म्हणाले की सर्व मातंग समाजाला प्रेरणादायी असे स्मारक असावे. शिक्षण आणि उद्योग या दोन क्षेत्रांमध्ये आपली भावी पिढी कशी प्रगती करेल त्या दृष्टिकोनातून मार्गाची आखणी करावी.
डॉ. नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या, की लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून स्मारकाचा उभारण्यासाठी प्रयत्न करेन. मातंग समाजाने विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिष्यवृत्ती अशा प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. सदरील कार्यक्रमासाठी बाळासाहेब भांडे, शांतीलाल मिसाळ, रवी पाटोळे, राम कसबे, राजू अडागळे या समिती सदस्यशांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश लोखंडे यांनी केले.