पिंपरी: प्रत्येक झाडाच्या सभोवती किमान ५० जीवांचे अस्तित्व असते. त्या जीवांना या रंगामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांचा सन्मान हिरावून घेऊ नका असे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव धनवे पाटील आपल्या निवेदनात म्हणाले. तसे निवेदन त्यांनी पिंपरी चिंचवड चे महापौर माई ढोरे यांना दिले.
माधव धनवे-पाटील महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हणाले की, शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रत्येक झाडाच्या सभोवती असणाऱ्या किमान 50 जिवांचे अस्तित्व असते. झाडाला दिल्या जाणाऱ्या रंगामुळे या जीवांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांचा सन्मान हिरावून घेऊ नका, व झाडांना विनाकारण रंग देण्याचे काम थांबवा असे त्यांनी सांगितले.
पुढे माधव पाटील असेही म्हणाले की झाडांना रंगरंगोटी चुकीची वाटत नसेल तर शहरातील सर्व कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्यात यावा. पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि झाडांना सन्मान मिळावा हा हेतू या निवेदनामागे असल्याचे माधव पाटील यांनी सांगितले. महापौरांनी सुद्धा यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल,तसेच ही रंगरंगोटी थांबवण्यात येईल असे आश्वासन दिले.