बालेवाडीत लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शन सोहळा

Paduka-Darshan-ceremony-of-12-Shakti-Peeths-of-India-at-Balewadi

पुणे: कोरोना महामारीनंतर प्रथमच पुणेकरांसाठी, विशेषत: बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळूंगेकरांसाठी एकाच वेळी भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा योग आला आहे. सामाजिक कार्यकर्ते लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेषत: ज्या वृद्ध लोकांना येवढ्या लांब जाऊन दर्शन करता येत नाही, अशा वयोवृद्ध भक्तांसाठी मोठी संधी आहे.


भाजप सदस्य लहू बालवडकर यांच्या पुढाकाराने पुण्यातील बालेवाडी परिसरातील गेनबा सोपानराव मोझे कॉलेजच्या मैदानात भक्तांसाठी पादुका दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा भाविक-भक्तांना लाभ घेता येणार आहे.


जगातील प्रत्येक धर्मानुसार पृथ्वीवरील विशिष्ट स्थाने पवित्र मानली जातात. या पवित्र स्थानांनाच तीर्थक्षेत्रे असे म्हटले जाते. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक-भक्त तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी येतात. यात्रेकरूच्या मनात रोगमुक्तीपासून ते मोक्षप्राप्तीपर्यंतचे अनेक हेतू असतात. दुःखातून व संकटातून सुटका करून घेणे, एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलणे, मनःशांती मिळविणे, पापमुक्त होणे, पुण्य प्राप्त करणे, महान व्यक्तींच्या समाध्यांना भेटी देणे इ. प्रयोजनांनी तीर्थयात्रा केल्या जातात. परंतू, गेल्या दीड-दोन वर्षापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने मंदीरांचे दार बंद केली. त्यामुळे इच्छा असतानाही नागरिकांना दर्शनासाठी बाहेर पडताय येत नाहीये.




कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी बिघडली असताना आता भारतातील विविध तीर्थक्षेत्रावर जावून नतमस्तक होणे शक्य नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे, लहू बालवडकर यांनी भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक-भक्तांना शुक्रवारी एकाचवेळी १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, लहू बालवडकर यांनी दोन वर्षापुर्वी अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला होता. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेला दर्शन सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी भक्ति-भावाने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लहू बालवडकर यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.