पिंपरी: मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक नसल्याचे समोर आले. यावर पर्याय म्हणून पदपथ फोडून त्या जागेत दफनविधी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी टि्विट केले. लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय. ही विटंबना तत्काळ थांबवा. आपण नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही? असा सवाल पार्थ पवार यांनी उपस्थित केला आहे.
मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीत मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, महात्मा फुलेनगर, विद्यानगर, दत्तनगर, आनंदनगर, साईबाबानगर, इंदिरानगर, मोरवाडी, लालटोपीनगर, अण्णासाहेब नगर, शाहुनगर, संभाजीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी येतात. मात्र, जागा माळरानाची असल्यामुळे दफन करण्यासाठी खड्डा खोदाईसाठी खूप परिश्रम घ्यावे लागत आहे.
#लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय. ही विटंबना तत्काळ थांबवा. आपण नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही? @pcmcindiagovin
— Parth Pawar (@parthajitpawar) November 23, 2021
लोकसंख्येनुसार दफनविधीसाठी पुरेशी जागा आहे की नाही हे पाहण्याचे काम आपले नाही का!! #PCMC
राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी टि्विट केले आहे. ते म्हणतात, ”लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय. ही विटंबना तत्काळ थांबवा. आपण नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही? @pcmcindiagovin लोकसंख्येनुसार दफनविधीसाठी पुरेशी जागा आहे की नाही हे पाहण्याचे काम आपले नाही का असे त्यांनी म्हटले आहे.