सोमेश्वर फाउंडेशनचा गौरी गणपती सजावट व नृत्य स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न



पाषाण: पुण्यातील पाषाण परिसरातील मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या सोमेश्वर फाउंडेशन तर्फे दिवाळी पूर्वसंध्याचा कार्यक्रम सुर तेची छेडीता या मराठी हिंदी गीतांच्या सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक, राजेश्वरी पवार ,अभिषेक सराफ, अश्विनी कुरपे या गायकांनी सुमधुर गीते गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन महेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी गौरी गणपती सजावट स्पर्धा व नृत्य स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विविध पारितोषिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गिफ्ट बॉक्स देऊनगौरविण्यात आले. 



हसता हुआ नूरानी चेहरा, जय जय शिवशंकर,तेरे चेहरे में वो जादू है, मनाच्या धुंदीत लहरीत येना,शोधिसी मानवा, अश्विनी येना, ऐरणीच्या देवा तुला, रुपेरी वाळूच्या बनात आदी विविध मधुर गीतांवर प्रसिद्ध गायकांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम केले असून कोरोना काळामध्ये त्यांनी ऑनलाईन स्पर्धा, लॉकडाऊन मध्ये 8 हजार गरजू नागरिकांना अन्नधान्याचे किट वाटप,महिलांना टेलरिंग प्रशिक्षण, दिवाळीनिमित्त गरजूंना अन्नधान्याच्या किट व फराळाचे वाटप,औंध, बाणेर ,पाषाण येथील सोसायटींना सिक्युरिटी गार्डला मोफत मास्क व सॅनीटायझरचे वाटप आदी सामाजिक उपक्रम केले आहेत.



याप्रसंगी मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण, मा. नगरसेविका स्वाती विनायक निम्हण, सुनील काशीद, विनायक काकडे, मुकुंद निम्हण, वासुदेव कोकाटे ,विजय कापरे व सोमेश्वर फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.