वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट

 

वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांचा शेवटच्या टप्प्यात पत्ता कट

मुंबई: राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, धुळे, कोल्हापूर, चंद्रपूर, अकोला या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून खबरदारी घेत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांना डावललं आहे. शेवटच्या टप्प्यात पत्ता कट झाला आहे. 


महिलांच्या मुद्यावर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रत्येक वेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. साहजिक चित्रा वाघ यांचं नाव विधानपरिषद आमदारकीसाठी पुढे आलं होतं. पण, ऐनवेळी त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. ऐनवेळी दिल्लीत झालेल्या घडामोडींमुळेच चित्रा वाघ यांचा पत्ता कट करण्यात आला असं देखील बोललं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांचा टक्का हा शिवसेनेच्या बाजूने असतो. त्यामुळे मराठी उमेदवार देण्याऐवजी भाजपने उत्तर भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे.


महिला अत्याचार असो अथवा इतर मुद्दे असो, कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवरटीकेचा आसुड सोडण्यात  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ  एकही संधी सोडत नाही. त्यामुळेच चित्रा वाघ यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचे स्वप्न पाहिले होते. पण, त्यांच्या स्वप्नावर आता त्यांच्याच पक्षानं पाणी फेरलं गेलं आहे. भाजपकडून मुंबई विभागातून राजहंस सिंह  यांना उमेदवारी दिली आहे. चित्रा वाघ यांनी अलीकडच्या काळात पूजा चव्हाण आत्महत्या  प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमकपणे बाजू मांडली होती. त्यामुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते आणि राजीनामा द्यावा लागला होता.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.