धायरी परिसरातून "दिवाळी पहाट संगीत मैफिल सुरोत्सव" कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

huge-response-to-the-Diwali-Pahat-program-organized-by-Mahesh-Pokale-from-Dhayari-area


धायरी: दिवाळीचा सण सर्जनशीलतेलाही भरभरून वाव देणारा. दिवाळी अंक, रांगोळी, कंदील निर्मितीच्या जोडीला गेल्या काही वर्षांत ‘दिवाळी पहाट’ हे सर्जनशीलतेला वाव देणारे आणखी एक व्यासपीठ मराठीजनांकरिता उपलब्ध झाले आहे. या विविध कार्यक्रमांतून रसिक मनाला मिळणारी सांस्कृतिक ठेव खूप काही देऊन जाते. गेल्या वर्षी करोना महामारीमुळे त्या मध्ये खंड पडला होता. या वर्षी समवेदना फाऊंडेशन व अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्स वतीने आयोजित दिवाळी पहाट संगीत मैफिल सुरोत्सवला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. पंडित शौनक अभिषेकी आणि मृण्मयी फाटक व सहकारी यांनी सादर केलेली शास्त्रीय गायनाची सुरेल मैफिल ही रसिकांसाठी एक पर्वणीच ठरली. 


अभिरुची मॉल परिसरातील भिडे बागेत भल्या पहाटे सकाळी सकाळी ५.४५ ला कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन   समवेदना फाऊंडेशनचे महेश राजाराम पोकळे, अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्सचे मालक सुनील भिडे, यशोधन भिडे, प्रिया पोकळे यांच्या हस्ते झाले. तब्बल सव्वा तीन तास रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध अशी संगीताची मेजवानी लाभली. पंडित शौनक अभिषेकी आणि मृण्मयी फाटक यांनी अप्रतिम असे शास्त्रीय गायन सादर केले. अविनाश पाटील यांनी तबल्याची तर उमेश पुरोहित यांनी हार्मोनियमची साथ दिली. मनोज भांडवलकर यांनी पखवाज वंदन केले. तसेच विश्वास कलमकर यांनी टाळवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. 


महेश राजाराम पोकळे यांनी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल परिसरातील भिडेंबागेमध्ये केले. गीत-संगीत, किस्से-आठवणी, अभिवाचन, शास्त्रीय गायन अशा विविध संकल्पनांवर आधारित  "दिवाळी पहाट संगीत मैफिल सुरोत्सव"  या कार्यक्रमाला  रसिकांचा भरघोस आणि उदंड प्रतिसाद मिळाला. 


दिवाळी पहाट मैफिल सुरोत्सव कार्यक्रम खूप चांगला झाला. कार्यक्रमात सादर केलेली गीते खूपच छान होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच नियोजन खूपच चांगले होते. - पराग कुलकर्णी 


करोना नंतर खूपच छान सुरवात झाली. दिवाळी पहाट या कार्यक्रमानंतर मन प्रसन्न झाले. मृण्मयी पाठक यांनी सादर केलेले गायन खूप सुंदर होते. प. शौनक अभिषेकी यांनी नेहमीप्रमाणेच सुंदर गायन केले -  वैदेही राम करमरकर 


सर्व कार्यक्रम सुंदर होता. सर्व गाणी चांगली होती. दरवेळेस दिवाळी निम्मित महेश पोकळे यांनी कार्यक्रम ठेवावा - अनिल केशव महाले 



सुंदर आयोजन, अप्रतिम सूत्र संचालन, सर्वच गाणी अतिशय आवडती आणि साजेशी. वाद्यवृंदही तसेच. खूप दिवसांनी अश्या सुंदर सुरांची मेजवानी अनुभवली - लाटकर 














 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.