पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले जहाजेवरील हॉटेल कार्निवल नावाचे जहाज 150 लांब तर उंची 35 फूट


पुणे: लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत गेल्या दोन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प झाला होता. या काळात व्यवसाय बंद असल्यानं खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाली. तरीही जिद्दीच्या जोरावर पुण्यातील व्यवसायिकांनी भुगाव या ठिकाणी मानस सरोवर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जहाजेवरील (शिप) हॉटेल सरोवर" मोठ्या दिमाखात सुरू केले आहे. सरोवर हॉटेलचं उद्घाटन मोठया दिमाखात नुकतेच पार पडले. या प्रसंगी सरोवर हॉटेलचे संचालक भरत कडू, देवांग कडू, समीर शेट्टी, राजेंद्र पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना कडू म्हणाले, की महाराष्ट्रातील पहिले जहाजेवरील (शिप) हॉटेल सरोवर आम्ही सुरू केले आहे. सदरील जहाज वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे जहाजाला तळ मजला, पहिला मजला व टॉप फ्लोअर असे आम्ही केले आहेत. या जहाजाला कार्निवल असे नाव दिले असून या जहाजाची लांबी 150 फूट, उंची 35 फूट तर रुंदी 70 फूट आहे. 


शेट्टी म्हणाले की सदरील हॉटेल बोटीवर असलेले  महाराष्ट्रातील एकमेव आहे. पुणेकरांना आता गोव्याला जायची गरज नाही गोव्याचा आनंद आता सरोवर हॉटेल या ठिकाणी अनुभवता येणार आहे. पठारे म्हणाले की सरोवर हॉटेलवर पुणेकरांना सर्वोत्तम सी फूडचा आस्वाद घेता येणार आहे. त्याच बरोबर महाकाय बोटीवर बसून शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद लुटता येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवांग कडू यांनी तर राजेंद्र पठारे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.