डॉ. कृणाल मेथा यांना बॉलीवूड चित्रपटातून संधी

Dr-Krinal-Metha-to-Opportunity-from-Bollywood-movie


 डॉ कृणाल नंदकिशोर मेथा ह्याला  'पुणे टू गोवा' ह्या हिंदी चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून अमोल भगत चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत. फॅन्ड्री फेम राजेश्वरी खरात बरोबरच आदित्यराजे मराठे देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय.

गोरेगाव - रायगड येथील रहिवासी असणारा कृणाल ह्याने पुण्यातील भारती विद्यापीठ मधून नुकतंच आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.

 चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शनने पुरेपूर भरलेला आहे. चित्रपटाची कथा वास्तविक आयुष्यात संघर्ष करणाऱ्या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे. कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या धोकादायक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे, अशी माहिती अमोल भगत यांनी दिली. चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस करीत आहेत.

चित्रपटात सुनिल पाल , एहसान कुरेशी ह्या सारखे दिग्गज कलाकार काम करत असून चित्रपटातील गाणी जावेद अली , शाहिद मल्ल्या , केतकी माटेगावकर ह्यांनी गायलेली आहेत सोबत पी. शंकरम , संनमित वाघमारे , निखिल बिष्ट , प्रतीक बोरसे ह्यांनी संगीतबद्ध केले आहेत. तसेच ह्या चित्रपटाचे संवाद लेखन रेड्डी , नो एंट्री , वेलकम बॅक ह्या सारख्या चित्रपटांचे संवाद लेखक राजन अगरवाल ह्यांनी केले आहे. चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.