एमएक्‍स टकाटक चा 'तड़प' साठी नाडियाडवाला ग्रांडसन एंटरटेनमेंटशी करार

Nadiadwala-signs-agreement-with-Grandson-Entertainment-for-MX-Takatak-s-Tadap

तडप चित्रपटासाठी  ऑफि‍शियल शॉर्ट व्हिडिओ पाटर्नर म्हणून एमएक्‍स टकाटक, या आघाडीच्या प्लॅटफॉर्म वर #TuMeraHoGayaHai चॅलेंज लाँच करण्यात आले आहे.


भारतातील आघाडीचा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म एमएक्‍स टकाटक यांनी नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट (NGE) सह भागीदारी केली आहे. या टाय-अपच्या अंतर्गत, एमएक्‍स  प्‍लेयर ला NGE च्या तडप या नवीन चित्रपटासाठी ' ऑफि‍शियल शॉर्ट व्हिडिओ पार्टनर' म्हणून सामील करण्यात आले आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताना दिसून येत आहेत. एम एक्स टकाटक ने  खासकरून #TuMeraHoGayaHai  हे चॅलेंज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केले आहे, जे यूजर्सना त्यांची रोमँटिक साइड दाखवण्यास आणि या ब्लॉकबस्टर ट्रॅकवर प्रेमाची कबुली देणारे व्हिडिओ तयार करण्यास सांगते. 

यासाठी नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटच्या सोशल मीडिया हँडलवर बेस्ट एंट्रीज प्रदर्शित केल्या जातील.


ही भागीदारी एमएक्‍स टकाटक ला आपली क्रिएटर कम्युनिटी विकसित करण्याचा  दृष्टीकोन आहे. तसेच मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांसोबत रोमांचक सहकार्याच्या संधी बरोबरच  प्लॅटफॉर्म ला आणखी प्रसिध्दी मिळण्याचा मार्ग आहे. विशाल भट्ट, दीपक जोशी, माहिरा खान आणि धर्मेश नायक ह्यांची नावे या प्लॅटफॉर्मच्या काही प्रमुख KOL मध्ये समाविष्ट आहेत ज्यांना या लिप सिंक/सीन क्रिएशन चैलेंज मध्ये उत्कृष्ट व्हिडिओज बनवल्यामुळे अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.


अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांनी NGE च्या ऑफि‍शियल एमएक्‍स टकाटक हँडलवरून लाइव इंटरैक्टिव सेशन या व्यासपीठावरील मोठ्या आणि वैविध्यपूर्ण समुदायाशी संवाद साधला ज्यामध्ये देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या चॅलेंजमध्ये कसा भाग घ्यावा याविषयी माहितीसाठी, खालील लिंक पहा

https://www.instagram.com/tv/CW-J_28grSY/ 


'तू मेरा हो गया है' हे गाणे प्रीतमने संगीतबद्ध केले आहे. यात चित्रपटातील प्रमुख पात्रांची प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. आणि प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.