पुणे: पुणे महानगर पालिकेच्या निवडणूका काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना पदे देण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रा. रविंद्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. प्राध्यापक रवींद्र पवार हे सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या तासगाव कवठेमहांकाळ सारख्या दुष्काळी पट्ट्यातून पुण्यात येऊन शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.. पुण्यासह महाराष्ट्रातील दहा जिल्ह्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील मुरब्बी वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नियुक्ती पत्र नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले.
पुणे शहर शिक्षक सेलच्या माध्यमातून शिक्षकांचे नेतृत्व करण्याची संधी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली. राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे आणि पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हयांनी मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले तसेच सर्वांच्या विश्वासास पात्र ठरून पक्षसंघटनेच्या माध्यमातून शिक्षक बंधू भगिनींच्या अडचणीला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने अविरत कार्यरत राहीन अशी ग्वाही या वेळी प्रा. रवींद्र पवार यांनी दिली
या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख - प्रवक्ते पुणे शहर, प्रभावती भूमकर - माजी सभापती हवेली, राजेश्वरी पाटील - खडकवाला महिला उपाध्यक्षा, आबा भूमकर तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपथित होते.