आमदार सुनिल शेळके यांच्यावर खडकवासला विधानसभा मतदार संघाची जबाबदारी 

 

आमदार सुनिल शेळके यांच्यावर खडकवासला विधानसभा मतदार संघाची जबाबदारी

पुणे: महाराष्ट्रातील लोकप्रिय व मावळचे कार्यतत्पर आमदार सुनिल शेळके यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खडकवासला, कर्जत व चिंचवड मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती इ. निवडणुकांच्या दृष्टीनेही पूर्वतयारी करावी. पुढील विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा हे उद्दीष्ट समोर ठेवून आपण ही जबाबदारी पार पाडावी असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.


सन २०१९ च्या महत्वपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये शेळके हे विरोधकांवर मात करून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. तसेच ते मतदारसंघातील जबाबदारी पार पाडत विकास कामांवर देखील लक्ष ठेवून कार्यरत असल्याने तरुणांचे व सर्वसामान्य नागरिकांचे ते चाहते आहेत. याकरिता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून खडकवासला, कर्जत व चिंचवड या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी शेळके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


आमदार सुनिल शेळके यांची काम करण्याची पद्धत व निवडणुकीतील प्रभावी व्युव्हरचना तसेच नुकत्याच झालेल्या देहू नगरपंचायत निवडणुकीत आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे आमदार शेळके यांच्यावर पक्षाने ही जबाबदारी सोपविली आहे. खडकवासला, पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या दृष्टीने या मतदार संघात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करणे, पक्षातील गटतट संपविणे व मतदार संघाचे निरीक्षण करून पक्षास कळविणे ही जबाबदारी आमदार शेळके यांना देण्यात आली आहे.


खडकवासला मतदार संघातील राष्ट्रवादीची सद्यस्थिती 

खडकवासला विधानसभा मतदार संघात पूर्वीपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व होते परंतु मध्यंतरीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपची चांगलीच ताकद दिसून आली पण गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत सचिन दोडके यांनी भाजपाच्या भीमराव तापकीर यांना चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे या मतदार संघातील राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढल्याचे दिसून येत आहे. 


 या मतदार संघातील रुपाली चाकणकर यांच्या सह  मातब्बर नेत्यांचे डायरेक्ट अजितदादा, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. तसेच महानगर पालिका निवडणुकांसाठी तिकिटासाठी राष्ट्रवादीतून रस्सीखेचही पाहायला भेटत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.