पुणे: फेसबुकच्या माध्यमातूनही व्यवसायाची वृद्धी घडवून आणली जाऊ शकते हे पूवो फेसबुक ग्रुपने दाखवून दिले आहे. गेल्या वर्षी महिला दिनाचे औचित्य साधत पुवो फेसबुक मार्फत पुवो शॉपिंग फेस्टचे आयोजन केले आहे. या पुवो शॉपिंग फेस्टचे उदघाटन पावनखिंड" चित्रपटात बाजी प्रभूंची भूमिका साकारणारे "अजय पुरकर" यांच्या हस्ते होणार आहे. हा उद्घाटन सोहळा ४ मार्च २०२२ रोजी ठीक सकाळी ११.३० पार पडणार आहे.
महिला दिनाचे औचित्य साधत पुवो शॉपिंग फेस्टचे आयोजन केले आहे. पुण्यातील डी. पी. रोड वरील नामांकित शुभारंभ लॉन्समध्ये मार्च महिन्यात ४, ५ आणि ६ मार्च रोजी हे तीन दिवसीय एक्सहिबिशन स्टॉल धारक व्यावसायिक आणि चोखंदळ पुणेकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. महारष्ट्रासहित भारतामधून शंभराहून अधिक अधिक स्टॉल धारक व्यावसायिक या शॉपिंग फेस्ट मध्ये आपला माल विक्री आणि प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत. या माध्यमातून शॉपिंग फेस्ट मध्ये सहभागी झालेले व्यावसायिक या परिसरातील लोकांना ऑनलाईन सुविधाही देत आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी पुवो शॉपिंग फेस्टचा वर्धापन दिन आहे.
या तीन दिवसीय प्रदर्शनातून तुम्हाला सुंदर शोभेच्या वस्तू, हातमागावरचे फॅब्रिक, महाराष्ट्र तसेच राजस्थान, केरळ येथून तयार होणाऱ्या हँड ब्लॉक प्रिंटेड फाब्रिक डिझाईनर साड्या, खण साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, फोटोवरून भरतकाम करून रेखाटलेले व्यक्तिचित्र, भित्तिचित्र, लग्न सण-समारंभाला देण्यासारख्या भेटवस्तू, नाजूक कोरीवकाम केलेले फॅब्रिक आणि ट्रॅडिशनल दागिने घरगुती खाद्यपदार्थ, घर व किचन यासाठी उपयुक्त गोष्टी यांची खरेदी करता येईल, शॉपिंग फेस्ट मध्ये शंभराहून अधिक स्टॉल असणार आहेत. या स्टॉल मधून खरेदीच्या अनानंदासोबतच रुचकर अश्या खाद्यपदार्थांचंही आस्वाद घेता येणार आहे.
‘मावळा द बोर्ड गेम’ चे खास आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांवर आधारित असलेल्याया खेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत घडलेल्या महत्वपूर्ण 101 घटनांचा या गेममध्ये समावेश आहे. प्रत्येक घटनेच्या वेळी काय घडलं, याची माहिती देणारी पुस्तिका या बोर्ड सोबत येणार आहे. त्यासोबत 20 मावळ्यांची माहिती देणारी पुस्तिका, दुर्गांची माहिती देणारी पुस्तिका देखील या गेमबोर्डसोबत मिळणार आहे. सोबतच पहिल्यांदाच "मावळा" घेऊन येत आहे जगातील सर्वात मोठा बोर्ड गेम. एकाच वेळी १०० मुलामुलींना खेळता खेळता इतिहासाची माहिती देणारा "महाप्रचंड" असा मावळा बोर्ड गेम. खूप तर खूप तुम्ही एखाद्या अम्यूजमेंट पार्क मधे भव्य असा बुद्धिबळाचा डाव खेळला असाल.. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित बोर्ड गेम खेळला आहात?? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित बोर्ड गेम चा खेळी आपल्यासाठी मुलांसाठी खेळाला जाणार आहे. "PUWO Shopping Fest" मधे खेळाला जाणार आहे.