पुणे:मुंबई ऑन्कोकेअर सेंटर ही कर्करोगांवर अत्यंत अद्ययावत उपचार करणारी डे केअर साखळी स्वरूपी संस्था आहे मुंबई व महाराष्ट्रात ७ सेंटर सध्या कार्यरत असून,गेली चार वर्ष कर्करोग ग्रस्तांना उच्चशिक्षित कर्करोग तज्ञांच्या मार्फत सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा डे केअर सेंटर संस्थेमध्ये वाजवी दरात सर्वसामान्य रुग्णांना देखील उपचार उपलब्ध होणार आहेत.
आज पुण्यातील मुंबई ऑन्कोकेअर सेंटर उद्घाटन सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला, कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या पुण्यात अशी सर्वसामान्य रुग्णांना सुविधा उपलब्ध झाल्याने मला मनस्वी आनंद होत आहे. येथील रुग्णांवर खात्रीलायक इलाज येथील स्पेशालिस्ट डॉक्टरची टीम करणार असल्याने या कर्करुग्ण सेंटरचा पुणेकरांना खुप फायदा होणार आहे. त्यांच्या इतर शाखा तसेच पुण्यातील नव्या शाखेस मी माझ्या वतीने शुभेच्छा देते.
डॉ.मंगेश मेखा म्हणाले मुंबई ऑन्कोकेअर सेंटर ची १०वी शाखा आणि पुण्यातील पहिली शाखा सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक सुखसुविधा व तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेता यावेत, तसेच सरकारी रुग्णालयं व खाजगी रुग्णालयाच्या तुलनेत आपल्याकडे कर्करोगावर पर्सनलाईज्ड उपचार, वाजवी दरात उपलब्ध असणार आहेत त्यामुळे या व्याधी असणाऱ्या पुण्यातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.
या कार्यक्रम प्रसंगी एम्.ओ.सी. चे संचालक व वरिष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. वशिष्ठ मणियार, डॉ.अशिष जोशी, डॉ. प्रीतम कळसकर, डॉ.क्षितिज जोशी, डॉ.मंगेश मेखा आणि डॉ.रितू दवे, आदी मान्यवर उपस्थित होते.