पुणे: ‘अँटमगिरी’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे आता ‘तिरसाट’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला असून येत्या 20 मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे वेगवेगळ्या शहरात जोरदार प्रोमोशन सुरु आहे. त्याच अनुषंगाने स्टाईल एलिट आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला "तिरसाट" मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी भेट दिली. अभिनेता नीरज सूर्यकांत आणि अभिनेत्री तेजस्विनी शिर्के यांनी या फेस्टिव्हलचा पूर्ण माहोल तिरसाटमय केला. उपस्थित प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून दाद दिली.
या वेळी ‘तिरसाट’ चित्रपटाचे निर्माते दिनेश किर्वे, अभिनेता नीरज सूर्यकांत आणि अभिनेत्री तेजस्विनी शिर्के यांनी उपस्थित लोकांशी मोकळे पणाने संवाद साधला. तिरसाट च्या "वरात स्पेशालिस्ट" या गाण्यावर धम्माल डान्स करत सर्व प्रेक्षेकांचं मनं जिंकलं. लहान-थोरांसह सगल्यांनीच या गाण्यावर ठेका धरला. तसेच येत्या २० तारखेला चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले. या कार्यक्रमाचे निवेदन चैत्राली माजगावकर यांनी केले.
स्टाईल एलिटचा शॉपिंग अँड फूड फेस्टिवल हा बावधनकारांसाठी आनंदाची पर्वणीच असते. या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला बावधनकर भरभरून प्रतिसाद देत असतात. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. यातून मोठ्या संख्येने व्यावसायिकांच्या उद्योग धंद्याच्या वाढीस चालना मिळत असते. हे वारंवार दिसून येत आहे.
उधाण आलंया, फर्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,' असे शब्द असलेलं "तिरसाट" चित्रपटातलं श्रवणीय गाणं नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अल्पावधीतच सोशल मीडियावर या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून २० मे रोजी "तिरसाट" हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आयोजक निकिता रणनवरे आणि जिगीशा यांनी "तिरसाट" चित्रपटाच्या टिमला शुभेच्छा दिल्या.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं "तिरसाट" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.निलेश कटके लिखित "फर्मान आलंया" हे गीत पी. शंकरम यांच्याच आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे, नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.