पुण्यात बिजनेस प्रोमोट करण्याची पुन्हा सुवर्णसंधी, स्टाईल एलिट शॉपिंग अँड फूड फेस्टिवलमध्ये आजच स्टॉल बुक करा

Golden Opportunity to Promote Business in Pune, Style Elite Shopping and Food Festival


पुणे: गेल्या महिन्यातील एल. एम. डी. चौकातील उदंड प्रतिसादानंतर स्टाईल एलिटच्या वतीने शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात  आहे. येत्या १४ आणि १५ मे रोजी सूर्यदत्ता कॉलेज शेजारील आठवडे बाजारच्या मैदानावर या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन होणार असून ८० ते ९० व्यावसायिक या मध्ये सहभाग घेणार आहेत. झपाट्याने विकसित होणाऱ्या बावधन वासियांसाठी येथे खरेदीबरोबरोच खाण्यापिण्याचाही आस्वाद घेता येणार आहे. या ठिकाणी व्यासायिकांना त्यांचा बिजनेस प्रोमोट करण्याची संधी भेटणार आहे. 


स्टाईल एलिटचा शॉपिंग अँड फूड फेस्टिवल हा बावधनकारांसाठी आनंदाची पर्वणीच असते. या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला बावधनकर भरभरून प्रतिसाद देत असतात. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. यातून मोठ्या संख्येने व्यावसायिकांच्या उद्योग धंद्याच्या  वाढीस चालना मिळत असते. हे वारंवार दिसून येत आहे. आपणही या शॉपिंग अँड फूड फेस्टिवल मध्ये सहभागी होऊन आपला व्यवसाय बावधन परिसर वाढवू शकता.  आपणाशी या मध्ये स्टॉल हवा असल्यास जिगीशा: ९८३४८८५०८९, निकिता: ९२२५५७७५८६ या नंबर वर संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला बावधन परिसरातून चालना मिळेल.


अश्या या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत स्टाईल एलिट हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तसेच व्यवसायावर असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचेही काम स्टाईल एलिट करत आहे. 


या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू आपणास खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत. याच बरोबर लहान मुलांच्या करमणुकींसाठी पपेट शो, जादूचे प्रयोग, आणि गाण्यांचे कार्यक्रमही होणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.