भारताचे सक्षम पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जन्मदिनापर्यंत 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' देशभर साजरा होणार आहे.
त्या अंतर्गत आज कोथरूड मतदारसंघात उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सेवा 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडयाचे उदघाटन केले. कोथरूड मधील नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले मिळण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले. तसेच अंगणवाडीमध्ये मुलांना बसण्यासाठी सतरंजीचे वाटप करण्यात आहे.
तसेच अंगणवाडीच्या इमारती, कार्यालयीन सामान यांच्या संदर्भात समस्या असेल तरी त्यांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश त्यांच्या संपर्क कार्यालयाला दिले. अंगणवाडी सेविका यांना त्यांच्या परिसराचे संपूर्ण ज्ञान असते, त्यांना मुला मुलींच्या घराच्या परिस्थितीबद्दल पण माहिती असते. त्यांनी परिसरामध्ये लक्ष ठेऊन कोणाला शैक्षणिक अडचण असेल तरी कळवण्यास सांगितले आहे. केवळ पैसे नाहीत म्हणून कोणाचे शिक्षण थांबू नये. तशी कोणाला अडचण असेल तर त्यांनी नि:संकोच पणे संपर्क साधण्याचे आवाहन केले.
तसेच याप्रसंगी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधताना त्यांचे मानधन वाढवण्यासाठी मुख्यमंत्रांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.