पुणे: कोथरूड परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन कोथरूडकारणांसाठी "ब्लॉसम शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी कोथरूड परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. १०, ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी कोथरूड येथील गांधी भवनच्या ग्राउंडवर हा फेस्टिवल सर्वांसाठी खुला राहणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता. त्यासाठी सोबत दिलेल्या नंबर वर संपर्क करून स्टॉल बुक करून सहभागी होण्याची संधी या निम्मिताने उपलब्ध होणार आहे.
या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू आपणास खरेदी करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. या मध्ये स्टॉल हवा असल्यास अनुप्रिता 8308061117 आणि भाग्यश्री 8806200681 यांना संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला कोथरूड परिसरातून चालना मिळेल.
कोथरूडकरांसाठी मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी तीन दिवस एकाच छताखाली मिळणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी १० ते रात्री ९. वाजेपर्यंत तसेच रविवारी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहील