भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेला हाकलून लावण्याची सुरूवात आता कसब्यातून होणार - नाना पटोले

 

The-beginning-of-ousting-the-tyrannical-system-of-BJP-will-now-start-from-the-Kasbah-Nana-Patole

पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पुण्यातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा आज जाहीर करण्यात आला.येथील फडके हॉल मध्ये आयोजित समाजाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. उमेदवार धंगेकर ,माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, खासदार वंदना चव्हाण ,आमदार संग्राम थोपटे, माजी महापौर अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, बाळासाहेब आमराळे, कमल व्यवहारे, पुणे शहर राष्ट्रवादीचे  अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे नेते संजय बालगुडे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र माळवदकर, तसेच शिवसेनेचे गजानन थरकुडे, प्रशांत बधे, विशाल धनवडे, विलास तावरे, युवराज देसले, सचिन आडेकर, सौरभ बंगाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


पटोले पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात नागरिकांवर अत्याचार व त्रास देणाऱ्यांचा कडेलोट करण्यात येत असे, आता कसब्याच्या या निवडणुकीत तुम्ही भरघोस मते महाविकास आघाडीच्या पदरात टाकून भाजपचा कडेलोट करण्याची संधी चालून आली असल्याचे त्यांनी सांगितले. 


भाजपने देशात अघोषित हुकूमशाही राबवत सुरू केलेल्या जुलमी व अत्याचारी व्यवस्थेला हाकलून लावण्याची सुरुवात कसब्यातून होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केले.


'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने भाजपचे वर्तन असून धंगेकर निवडून आले तर त्यांना विकास कामांसाठी निधी देणार नाही असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच विधान केल्याचे आपणास समजले असून आता तर तडीपार व खूनाचा आरोप असलेल्या गुंडांना भाजपची मंडळी बरोबर घेऊन फिरत असल्याचे दिसत आहेत. ही निवडणूक त्यांच्या हातातून कधीच गेल्याने अस्वस्थ होत त्यांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला असल्याचे म्हटले. मराठा समाजाचे नेते व मेळाव्याचे आयोजक बाळासाहेब आमराळे यांनी प्रास्ताविक केले तर युवराज देसले यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.